आई नाही तर मुलगी नाही
मुलगी नाही तर मुलगा नाही
नकोशी ! नकोशी ! नकोशी !
नका खेळू तिच्या जीवाशी
तिला करा आपलीशी
मुलगाच हवा हट्ट नाही नवा
मुलगीच लावेल वंशाचा दिवा
लक्ष्मी येते दारी
स्त्री जन्म लई भारी
नका करू भेदभाव
मुलीलाच मुलगा माना की राव !
कशाला हवा वंशाचाच दिवा
भाग्याची पणती ठेवा
एक एक कळी जपूया
लेक वाचवूया
घटतेय मुलींचे प्रमाण
लक्ष्यात घ्या मुलगा-मुलगी एकसमान
स्त्रीभ्रूणहत्या थांबवा
लेक वाचवा
मुलगी वाचवा
देश वाचवा




















